Wednesday 8 March 2017

चालू घडामोडी - २६, २७ फेब्रुवारी

१. अंतरराष्ट्रीय ऑलंपिक आयोगाच्या अथेलेट आयोगामध्ये बैडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे?
उत्तर - साइना नेहवाल, भारतीय बैडमिंटनपटु साइना नेहवाल आईओसीच्या अथेलेट आयोगाच्या बैडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. ह्या प्रकारची संधी मिळणे हे भारतीय खेळाडूंसाठी दुर्मिळ आहे. ह्यआधी २०१६ मध्ये तिची आईओसीच्या अथेलेट आयोगामध्ये सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
२. कोणत्या राज्य सरकारने स्त्री-पुरुष समानतेवर देखरेख ठेवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे?
उत्तर - हरियाणा, 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजने अंतर्गत हरियाणा सरकारने पानीपत जिल्ह्यामध्ये स्त्री-पुरुष समानतेवर लक्ष ठेवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे. ह्या प्रकल्पांतर्गत मासिक तत्त्वावर प्रत्येक गावातून बाल गुणोत्तर जमा केले जाईल आणि ऑनलाइन साठविले जाईल.
३. ८९ व्या ऑस्कर पुरस्करांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला?
उत्तर - मूनलाइट, बैरी जेनकिन्स यांनी दिग्दर्शित केलेल्या मूनलाइट ह्या अमेरिकन चित्रपटाला ८९ व्या ऑस्कर पुरस्करांमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला. हा कार्यक्रम लॉस एंजेल्समधील डॉल्बी थिएटर मध्ये पार पडला. त्याचप्रमाणे ह्याच चित्रपटाला सर्वोत्तम सह-कलाकार, सर्वोत्तम पथकथेचे रूपांतर पुरस्कार मिळाला.

४. भारतातील पहिला हिल स्टेशन सायकल रस्ता कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - पश्चिम बंगाल, भारतातील पहिला हिल स्टेशन सायकल रस्त्याचे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये उद्घाटन करण्यात आले. २० किमिचा रस्ता समुद्र सपाटीपासून २००० मीटर उंचीवर असून निळ्या आकाशाखाली पाइन झाडांच्या जंगलातून जातो. हा रस्ता भारतीय त्याचप्रमाणे परदेशी पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. हा रस्ता जोरबंगला सुरु होतो आणि इको-विलेज रिसोर्ट चटकपुर येथे संपतो.
५. कोणत्या संघाने ५ व्या कोल इंडिया हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद जिंकले आहे?
उत्तर - कलिंगा लैंसर्स, चंडीगड़ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये कलिंगा लैंसर्सने दबंग मुंबईला ४-१ ने मात देऊन ५ व्या कोल इंडिया हॉकी इंडिया लीगचे जेतेपद जिंकले आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश विज़ार्ड्सने कांस्य पदक जिंकले. दबंग मुंबईचा फ्लोरियान फुच्स ह्या मालिकेचा मालिकावीर ठरला.
६. नव्या जागतिक संपत्ती अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत शहर कोणते आहे?
उत्तर - मुंबई, वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार ८०२ अब्ज संपत्ती असलेले मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर असून जगामध्ये १४ क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. मुंबई हे ४६००० कोट्याधीशांचे तर २८ अब्जाधीशांचे घर असून त्याखालोखाल दिल्ली, बंगलुरु, हैद्राबाद आणि पुणे आहेत.
७. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्विस सेंटर सुरु केले आहे?
उत्तर - मध्यप्रदेश, मध्य प्रदेशातील विदिशा पोस्ट ऑफिस मध्ये मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी भारततील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्विस सेंटरचे उद्घाटन केले. हे सेवाकेंद्र पासपोर्ट लघु सेवा केंद्र म्हणून काम करेल. त्याचप्रमाणे पासपोर्ट अर्जाची छाननी करुण अर्जदाराला ३ दिवसांमध्ये पासपोर्ट देईल.

चालू घडामोडी : १७ फेब्रुवारी

१. कोणता देश १०व्या अंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक शासनपद्धत अभ्यास आणि सिद्धान्त परिषद भरविणार आहे?
उत्तर - भारत, १० व्या इंटरनॅशनल कांफ्रेंस ऑन थेरी एंड प्रैक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॉवर्नन्स  भारतातील नवी दिल्ली मध्ये ७ ते ९ मार्च दरम्यान पार पडणार आहे. ह्या परिषदेमध्ये सरकार, सरकारी संस्था, नागरी समाज, खाजगी संस्था एकत्र येऊन डिजिटल गोव्हरमेंट बाबत त्यांचे मत आणि अनुभव शेअर करतात. २०१७ चा विषय आहे "सुज्ञ समाज निर्मिती: डिजिटल सरकार पासून डिजिटल सशक्तीकरणापर्यंत".
२. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला २०१७ चा यूनाइटेड किंगडमचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - शंड पनेसर, मूळ भारतीय वंशाचे शंड पनेसर यांना यूनाइटेड किंगडम मधील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ते स्कॉटलैंड यार्ड मध्ये कॉन्स्टेबल असून सप्टेंबर २०१६ मध्ये लंडनमध्ये आग लागलेल्या इमारतीमधून काही व्यक्तिंची सुटका केली होती.
३. २०१७ च्या राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कर कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर - शाहरुख खान, ४ थ्या राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कर २४ फेब्रुवारी रोजी शाहरुख खानला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार निर्माते-दिग्दर्शक यांच्याकडून चित्रपट क्षेत्रामध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या व्यक्तिंना दिला जातो.

४. कैनाडामध्ये भारतीय हाई कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विकास स्वरुप, १९८६ बैचचे भारतीय परराष्ट्र सेवा ऑफिसर विकास स्वरुप यांची कनाड़ामध्ये भारतीय हाई कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते त्यांच्या "क्यू एंड ए" कादंबरीसाठी प्रसिद्ध असून ह्याच कादंबरीच्या आधारावर "स्लमडॉग मिलियनेयर" चित्रपट तयार करण्यात आला आहे. स्वरुप सध्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असून त्यांच्या ठिकाणी अरुणकुमार साहू यांची नेमणूक करण्यात आली आहे.
५. २०१६ चा भारतीय वार्षिक उद्योजक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर - विवेक चंद सहगल, मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष विवेक चंद सहगल यांना २०१६ च्या एन्टेर्प्रेनुएर ऑफ़ दी ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार
त्याचप्रमाणे इनफ़ोसिसके सहाय्यक संस्थापक नंदन नीलकेणी यांना आधार कार्ड निर्मितीमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
६. अंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - कनाडा, नुकतेच भारतीय विमान प्राधिकरण आणि अंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना मिळून 'स्काईरेव ३६०' सिस्टम सुरु केली असून त्यांतर्गत इ-बिलिंग, इन्वॉइसिंग, किती महसूल मिळाला यांची माहिती भारतीय विमान प्राधिकरनाला मिळणार आहे. ही ह्यप्रकारची महत्त्वाची प्रणाली असून ही प्रणाली जगातील सर्व विमानतळांना जमा महसूल, कमी वाद किंवा चूका होण्यासाठी मदत करणार आहे. अंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना ही जगातील सर्व वैमानिक कंपन्यांची व्यापर संघटना असून तिचे मुख्यालय कनाडामधील मोंटेरल येथे आहे. 

Friday 17 February 2017

चालू घडामोडी : १-२ फेब्रुवारी

१. २०१७ च्या सूरजकुण्ड अंतरराष्ट्रिय क्राफ़्ट मेल्यासाठी कोणते राज्य विषय असेल?
उत्तर - झारखंड, ३१ वा सूरजकुण्ड क्राफ़्ट मेला १ फेब्रुवारीपासून हरियाणातील फरीदाबादमध्ये सुरु झाला. हा मेला हरियाणा पर्यटन महामंडळ, केंद्रीय पर्यटन सांस्कृतिक मंत्रालय आणि सूरजकुण्ड मेला यांच्यासहयोगाने भारविण्यात आला आहे.  हा मेला १९८७ पासून सुरु सुरु करण्यात आला असून दरवेळी ह्या मेल्यामध्ये एखादे राज्य, संस्कृती ह्यांना विचारात घेऊन मेला भारविण्यात येतो. यंदा झारखंड राज्य विषय असून संपूर्ण देशातील हस्तकला, हातमाग, सांस्कृतिक वस्तुंचे प्रदर्शन भारविण्यात आले आहे. ह्या मेल्यामध्ये सर्व भारतीय राज्ये आणि २० देशांनी सहभाग घेतला आहे.
२. सैनिकांसाठी सूचना प्रणाली आणि प्रशिक्षण खात्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - जेएस चीमा, ;लेफ्नेंट जनरल जगबीर सिंग चीमा यांची सेना अधिकाऱ्यांच्या इनफार्मेशन सिस्टम आणि ट्रेंनिंगच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
३. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर - स्तुती नारायण कांकेर, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग हा महिला आणि बालविकास मंत्रालया अंतर्गत काम करत असून स्तुती नारायण कांकेर ह्या सध्याच्या अध्यक्ष आहेत. सध्या आयोगाने देशामध्ये बाल अधिकारांना बढ़ावा देण्यासाठी लघु चित्रकथा, फोटो, पोस्टर स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. लघु चित्रपट स्पर्धेतील विजेत्यांना १ लक्ष, ७५ हजार, ५० हजार अशी तीन पारितोषिक जाहिर केली आहेत. तर फोटो आणि पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना ५० हजार, ३० हजार, १० हजार अशी पारितोषिके आहेत. ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना कोणत्या प्रकारचे सहभाग शुल्क नाही.
४. भारतीय सैन्य दलाच्या मुख्य  इंजिनीअरपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - सुरेश शर्मा, लेफ्टनंट जनरल सुरेश शर्मा यांची भारतीय सैन्य दलाच्या मुख्य इंजीनयरपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ते अभियांत्रिकी कामांसाठी भूसैन्य दलाच्या, नेवी, हवाई दलाच्या प्रमुखांचे सल्लागार म्हणून ही काम करणार आहेत. ह्यआधी ते सीमा रोड संस्थेचे २४ वे कार्यकारी अधिकारी होते.
५. "दी मैन हू बिकम खली" पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - दलीप सिंग राणा, "दी मैन हू बिकम खली" पुस्तकाचे संपादन दलीप सिंग राणा आणि विनीत बंसल यांनी केले आहे. ह्या पुस्कतामध्ये त्यांनी एका सामान्य माणसाचे म्हणजेच दलीप सिंग राणाच्या जीवन प्रवासाचे चित्रीकरण केले आहे जो दलीप सिंग पासून दी ग्रेट खली झाला. ज्याने आपल्यातील राक्षसावर आणि शारीरिक विसंगतींवर बंधन ठेवून वर्ल्ड हेवीवेट चैंपियनशिप जिंकली.
६. तिसऱ्या तांत्रिकी शिक्षण दर्जा सुधार कार्यक्रमासाठी जागतिक बँकेने किती कर्ज स्वीकृत केले आहे?
उत्तर - २०१.५० दशलक्ष, भारत सरकारने नुकतेच जागतिक बँकेसोबत तांत्रिकी शिक्षण दर्जा सुधार कार्यक्रमासाठी २०१.५० दशलक्ष रक्कमेसाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ह्या कार्यक्रमांतर्गत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, ८ ईशान्येकडील राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटेमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. 

Thursday 9 February 2017

चालू घडामोडी : ३१ जानेवारी

१. कॉमिशन ऑफ अफ्रीकन युनियनच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणुक करण्यात आली आहे?
उत्तर - मौसा फाकी, छड़ राष्ट्राचे माजी पंतप्रधान मौसा फाकी महामत यांची अफ्रीकन यूनियन कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. ह्याआधी इकोसैन दल्मिनी-ज़ूमा ह्या ऑक्टोम्बर २०१२ ते जानेवारी २०१७ ह्या दरम्यान अध्यक्षा होत्या. अफ्रीकन यूनियन कमीशन हे अफ्रीकन देशांसाठी प्रशासकीय संस्था म्हणून काम बघते तीचे इथोपियामधील एड्डीस अबाबा येथे मुख्यालय आहे.
२. बोर्ड ऑफ़ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया अर्थातच बीसीसीआईच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - विनोद राइ, माजी भारतीय कैग यांची बीसीसीआईच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राइ हे ४ सदस्यीय समितीचे मुख्य असून बीसीसीआईचे प्रशाकीय काम पाहातील. चार सदस्यीय समितीमध्ये माजी क्रिकेट कर्णधार डायना एडुल्जी, इतिहासकार रामचंद्र गुहा आणि विक्रम लामाये यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी  मध्ये होणाऱ्या आईसीसीच्या बैठिकीमध्ये विक्रम लामाये आणि अमिताभ चौधरी हजर राहणार आहेत.
३. एम्मानुएल रीवा ह्या अभिनेत्रीचे नुकतेच निधन झाले,त्या कोणत्या देशाच्या होत्या?
उत्तर - फ़्रांस, एम्मानुएल रीवा यांचे नुकतेच पॅरिस येथे निधन झाले त्या ८९ वर्षांच्या होत्या, हिरोशिमा मोन अमौर एंड अमौर चित्रपटामधील भूमिकेसाठी त्या प्रसिद्ध आहेत.

४. भारतातील सर्वात मोठे इनक्यूबेटर कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात येणार आहे?
उत्तर - कर्नाटक,भारतातील सर्वात मोठे इनक्यूबेटर कर्नाटकातील हुबळी येथे गुरुराज देशपांडे हे तैयार करणार असून भारतीय-अमेरिकन वंशाचे उद्योजक, समाजसेवक आणि भांडवलदार आहेत. ह्या प्रकल्पाच्या मुख्य उद्देश्य म्हणजे तेथील स्थानिक लोकांना व्यवस्थापन, आर्थिक धड़े देऊन जागतिक इन्नोवेटर्स सोबत जोडने हा आहे. ८२००० वर्गफुट जगा असणारा हा प्रकल्प सप्टेंबर २०१७ मध्ये खुला करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे १२०० लोक बसतील इतक्या क्षमतेचा हा प्रकल्प असून २०० स्टार्टस अप सामवू शकतात. सध्या तेलंगानातील टी-हब हा भारतातील सर्वात मोठा इनक्यूबेटर असून ७०००० वर्गफुटा पसरला आहे.
५. "दी मॅन हु कूल्ड नेवर से नो" पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - एस मुथया, प्रसिद्ध इतिहासकार एस मुथया हे "दी मॅन हु कूल्ड नेवर से नो" पुस्तकाचे लेखक असून हे पुस्तक टी टी वासू ह्यांच्यावर आधारित आहे. टी टी वासू हे प्रसिद्ध उद्योजक टी टी कृष्णामाचारी यांचे लहान पुत्र आहेत.
६. डिजीटल रेडियो गोलमेज परिषद कोणत्या केंद्रीय मंत्र्याने सुरु केली आहे?
उत्तर - एम वैंकया नायडू, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वैंकया नायडू यांनी डिजीटल रेडियो गोलमेज परिषदेचे उद्धघाटन केले. ही परिषद डिजीटल रेडियो मोंडिअले आणि ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कॉउन्सलटैंट्स इंडिया लिमिटेडने आयोजित केली होती. ह्या परिषदेचे मुख्या उद्देश्य म्हणजे भारतीय भांडवलदारांचे लक्ष सार्वजनिक रेडियो डीजीटाइजेशनमध्ये वळविण्यासाठी करण्यात आले होते. 

Tuesday 7 February 2017

चालू घडामोडी : ३० जानेवारी

१. २०१७ ची पुरुष ओपन ऑस्ट्रेलियन टेनीस स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर - रॉजर फेडरर, स्विट्ज़रलैंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने २०१७ ची ऑस्ट्रेलियन टेनीस स्पर्धा जिंकून आपल्या करकिर्दीतील १८ वे ग्रैंड स्लैम चषक जिंकले आहे. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये त्याने स्पेनच्या रफाल नादालचा ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा पराभव केला. २०१२ विम्बलडन नंतर फेडररने ही पहिली मोठी स्पर्धा जिंकली आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी ओपन ग्रैंड स्लैम स्पर्धा जिंकणारा तो दूसरा खेळाडू ठरला आहे. याआधी १९७२ मध्ये ऑस्ट्रेलियन केन रोसवैल यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती.
२. भारतामध्ये २०१७ चा राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या तारखेला पाळाला गेला?
उत्तर - जानेवारी २९, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २९ जानेवारी रोजी म्हणजेच राष्ट्रीय लसीकरण दिनी राष्ट्रपती भवन येथे पाच वर्षांखालील मुलांना पोलिओची लस देऊन राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला. ह्या कार्यक्रमांतर्गत १७ करोड लहान मुलांना लसीकरण करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे देशाला पोलिओ मुक्त ठेवण्यासाठीचे हे १ पाऊल होते.
३. २०१७ ची पुरुष एकेरी सईद मोदी ग्रैंड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर - समीर वर्मा, २०१७ ची पुरुष एकेरी सईद मोदी स्पर्धा समीर वर्माने जिंकली आहे. लखनऊमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये त्याने बी साई प्रणीतचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. तर महिला एकेरीमध्ये ऑलंपिकपदक विजेत्या पी व्ही सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीमध्ये ही भारतानेच पदक पटकाविले. अंतिम सामन्यामध्ये प्रणव जेर्री चोप्रा आणि इन सिक्की ह्या जोडीने अश्विनी पोनाप्पा आणि बी सुमीत रेड्डी यांचा २२-२०, २१-१० असा पराभव केला.
४. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - ऐ पी सिंग, १९८६ बैचच्या इंडियन पोस्टल सर्विस ऑफिसर ऐ पी सिंग यांची इंडियन पोस्टल पेमेंट बँकेच्या एम्डी आणि सीईओ पदी नेमणूक करण्यात आली आहे.
५. कोणत्या देशाने जगातील पहिला डिजीटल एम्बेसडर नियुक्त करण्याचे ठरविले आहे?
उत्तर - डेन्मार्क, डेन्मार्कने जगातील पहिला डिजीटल एम्बेसडर नियुक्त करण्याचे ठरविले आहे. ह्याअंतर्गत डेन्मार्क जागतिक टेक कंपन्यासोबत करार करणार आहे.
६. आईरिस मिट्टेनरला  २०१६ च्या मिस युनिव्हर्स कितबाने सन्मानित करण्यात आले ती कोणत्या देशाची आहे?
उत्तर - फ़्रांस, ३० जानेवारी २०१७ रोजी फिलिप्पीन्सच्या मनिला येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये आईरिस मिट्टेनरला २०१६ ची मिस युनिव्हर्स घोषित करण्यात आले. फ़्रांस देशातील टी दूसरी मिस युनिव्हर्स महिला ठरली आहे, ह्यआधी १९५३ मध्ये क्रिस्टियान मार्टेल ही मिस युनिव्हर्स म्हणून निवडून आली होती.
७. "मदर टेरेसा - दी फाइनल वर्डिक्ट" पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - अरूप चटर्जी, ब्रिटिश भारतीय लेखक आणि डॉक्टर अरूप चटर्जी "मदर टेरेसा - दी फाइनल वर्डिक्ट" पुस्तकाचे लेखक आहेत. 

Wednesday 1 February 2017

चालू घडामोडी : १८ जानेवारी

१. कोणत्या भारतीय क्रिकेटरची लीजेंड क्लब "हॉल ऑफ फेम" म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे?
उत्तर - कपिल देव, माजी भारतीय क्रिकेटर आणि कर्णधार कपिल देवची लीजेंड क्लबच्या "हॉल ऑफ़ फेम" म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
२. यूरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी अंटोनिओ तजनी यांची निवड करण्यात आली आहे ते कोणत्या देशाचे आहेत?
उत्तर - इटली, इटलीचे राजकारणी अंटोनिओ तजनी यांची यूरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ह्यआधी ते यूरोपियन संसदेचे उपाध्यक्ष होते आणि यूरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष होते.
३. २०१६ चा दी हिंदू प्राइज कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
ऊत्तर - किरण दोषी, गुजरातचे निवृत्त शिक्षणतज्ज्ञ आणि मुत्सद्दि किरण दोषी यांना दी हिन्दू प्राइज २०१६ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना है पुरस्कार त्यांच्या "जिन्हा ऑफन कम टू ऑउर हॉउस" ह्या राजनीतीवर आधारित कादंबरीला मिळाला आहे. मानचिन्ह आणि रोख ५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

४. मावल्यंनोंग हे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे?
उत्तर - मेघालय, मावल्यंनोंग हे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ शहर असून ते मेघालायमधील पश्चिम खाँसी हिल्स जिल्ह्यामध्ये येते. हे गाव त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असून दररोज ५०० हून अधिक भारतीय आणि परदेशी पर्यटक ह्या गावाला भेट देतात. २००३ मध्ये ह्या गावाला आशियातील स्वच्छ गाव हा पुरस्कार मिळाला होता. गावाची स्वच्छता राखण्यासाठी गावातील ५५० लोक दर शनिवारी स्वच्छता अभियान राबवतात. ह्याच स्वच्छतेच्या माध्यमातून गावातील लोक रोजगार मिळवितात आणि हे गाव ईशान्य भारतातील १ महत्त्वाचे पर्यटन ठिकाण आहे.
५. नुकताच कोणता देश यूरोपीयन आण्विक संशोधन संघटनेचा सहकारी सदस्य बनला आहे?
उत्तर - भारत, नुकताच भारत यूरोपीयन आण्विक संशोधन संघटनेचा सहकारी सदस्य बनला आहे. ह्यासाठी लागणाऱ्या सर्व अंतर्गत प्रक्रिया भारताने २०१६ नोव्हेंबर २०१६ मध्ये पूर्ण केल्या आहेत. ह्या सहभागामुळे भारतातील शास्त्रज्ञ, इंजिनीअर यूरोपीयन आण्विक संशोधन संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. ही संघटना जगातील सर्वात मोठी पार्टिकल प्रयोगशाळा चालविते. ह्या संघटनेची स्थापना २९ सप्टेंबर १९५४ रोजी झाली असून मुख्यालय स्विट्ज़रलैंडमधील जेनेवा येथे आहे.
६. वर्ल्ड इकॉनोमिक फोरमच्या इंक्लूसिव डेवलपमेंट इंडेक्स २०१७ मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
उत्तर - ६० व्या, वर्ल्ड इकॉनोमिक फोरमच्या इंक्लूसिव डेवलपमेंट फोरम २०१७ च्या ७० विकसनशील देशांच्या यादीमध्ये भारत ६० व्या स्थानी आहे. ह्या यादीमध्ये लिथुआनिया प्रथम स्थानी असून त्याखालोखाल अज़रबैजान आणि हंगेरी आहेत. ह्या निकशासाठी १२ घटकांना विचारात घेतले जाते त्यापैकी विकास, जेनेरेशनल इक्विटी आणि सस्टेनेबिलिटी हे महत्त्वाचे ३ घटक आहेत.
७. भारतातील पहिले कैशलेस बेट  करंग कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - मणिपुर, केंद्रीय मंत्रालयाच्या डिजीटल भारत प्रोग्रामाअंतर्गत येणाऱ्या कैशलेस इंडिया कार्यक्रमामध्ये मणिपुर राज्यातील करंग बेट पहिले कैशलेस बेट झाले आहे.